मविप्र समाजाच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील २५ विद्यार्थ्यांची विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये मध्ये निवड झाली असून त्यामध्ये कोटक लाईफ आणि टी सी एस या कंपनीने वार्षिक ५.२५ लाख इतके वार्षिक पॅकेज दिले. त्याचप्रमाणे संडोझ (नोवार्टीस) ,मायक्रोलॅब्स व इंटास यांनी देखील वार्षिक ३.५ लाख इतके पॅकेज दिले. याव्यतिरिक्त युनिकेम,मॅक्लॉइड या कंपन्यांनी सरासरी वार्षिक ३ लाखापर्यंत पॅकेज देऊ केले आहे. प्लेसमेंट झालेले विद्यार्थी हे फार्मासुटीक्स,क्वालिटी अश्युरन्स आणि फार्मासुटीकल्स केमिस्ट्री या विषयात एम फार्म करीत आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे,संचालक ॲड. संदीप गुळवे,संचालक विजय पगार,शिक्षणाधिकारी डॉ अशोक पिंगळे,डॉ अजित मोरे उपस्थित होते.