Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

शिक्षकांनी प्रयोगशील व कृतीशील असावे…शिवव्याख्याते प्रशांत देशमुख

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी जोपासून त्यांच्यामध्ये चारित्र्याची बीजे रोवावीत. नवनवीव विषयातील संशोधनामध्ये शिक्षकांनी सहभागी व्हावे. शैक्षणिकदृष्ट्या विविध विषयांमध्ये प्रयोगशील व कृतीशील असावे असे शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी सांगितले ते मविप्र संस्थेच्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त सेवक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले तर व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे,उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती डी बी मोगल,संचालक डॉ सयाजीराव गायकवाड,रमेश आबा पिंगळे,ॲड संदीप गुळवे,ॲड आर के बच्छाव,ॲड लक्ष्मण लांडगे,संचालक विजय पगार, संचालक शिवाजी गडाख,महिला संचालिका शालन सोनवणे,शोभा बोरस्ते,अमित बोरसे,सेवक संचालक सी डी शिंदे,डॉ एस के शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ अशोक पिंगळे, डॉ भास्कर ढोके,डॉ विलास देशमुख, डॉ नितीन जाधव,डॉ ज्ञानेश्वर लोखंडे,डॉ अजित मोरे, प्रा बी डी पाटील,प्रा दौलत जाधव, प्राचार्य डॉ आर डी दरेकर,डॉ प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते.

देशमुख पुढे म्हणाले की ‘ विद्यार्थ्यांवर शिवचरित्रातील विचारांचे संस्कार करावे. यासाठी विद्यार्थ्यापर्यंत शिवचरित्र पोहचले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिवकालीन किल्ल्यांचे महत्वं कळावे यासाठी विविध किल्यांना अभ्यासभेटीचे आयोजन करावे असे सांगून आज विविध क्षेत्रात अनागोंदी पसरली आहे मात्र शिक्षण क्षेत्रातील शिक्षक रुपी तुळस आजही समाजातील वातावरण राखू शकते असे विचार देशमुख यांनी मांडले.

सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी ‘ डॉ राधाकृष्णन हे शिक्षणतज्ञ होते. समाजामध्ये शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षण संस्थांच्या वाटचालीत शिक्षकांचे बहुमुल्य योगदान असून आई-वडीलांनंतर शिक्षक हा सर्वात मोठा गुरु असतो असे सांगितले.

उपसभापती डी बी मोगल यांनी ‘ शिक्षक हे जीवनातील महत्वाचे अंग असून ते आयुष्य घडवितात,आपल्याला ज्ञान,प्रेरणा संस्कार देतात. मविप्र संस्था शिक्षकांचा नेहमी सन्मान करते.

सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी ‘ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई ही पहिली शिक्षक असते,मात्र जीवनाला दिशा देण्यासाठी,जीवनाच्या जडणघडणीत शिक्षक मोलाची भूमिका निभावतात,त्यामुळे सामर्थ्यवान पिढी निर्माण होऊन राष्ट्र बळकट होते.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० येत असून डिजीटल एज्युकेशन ला महत्व प्राप्त होत आहे.याच दृष्टीने मविप्र विद्यापीठ उभारणीसाठी प्रयत्नशील आहे.मविप्र संस्थेच्या वतीने उद्योजकतेचे धडे विद्यार्थ्यांना देत आहोत. खेळामधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी १५ जानेवारीला त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येईल. तसेच विनाअनुदानित तत्वावरील सर्व कर्मचाऱ्यांना संस्थेच्या वतीने पगारवाढ करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला असून त्यासाठी महिन्याला १.७५ कोटी रुपयांचा भार संस्थेवर पडणार आहे.

Leave a Comment