Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

निफाड महाविद्यालयात जिमखाना नूतन इमारतीचे उद्घाटन

कर्मवीर गणपतदादा मोरे यांचे नाव दिलेल्या निफाड महाविद्यालयाला पन्नास वर्षांची मोठी परंपरा आहे. गणपत दादांच्या विचारांचे व कृतीचे आपण पाईक होऊन तालुका व परिसरातील विद्यार्थी व पालक, सभासदांच्या गरज व मागणीनुसार, विद्यापीठाच्या नियमांचा सखोल अभ्यास करून व्यवसायभिमुख कोर्सच्या अंतर्गत निफाड येथे नवीन महाविद्यालय उभारणी करण्याचे आश्वासन सर्व कार्यकारिणीच्या वतीने सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी दिले. निफाड महाविद्यालयात दिनांक २ सप्टेंबर रोजी जिमखाना नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ॲड.नितीन ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात निफाड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नैपुण्याबरोबरच विभागीय, विद्यापीठस्तरीय, आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत मंजीत कुमार मेहतो या विद्यार्थ्याच्या रूपाने गोळा फेक स्पर्धेत भारतात प्रथम गोल्ड मेडल निफाड महाविद्यालयाने मिळवून दिले ही संस्थेसाठी व जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट असून आज या विद्यार्थ्यांना सर्व सोयींनी सुसज्ज अशी जिमखाना स्वतंत्र इमारत होणे ही खूप गरजेची गोष्ट होती. निफाड महाविद्यालयासाठी व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व संचालक मंडळ महा. व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य, सर्व सेवक यांचे सहकार्य व साथ नेहमी मिळत आली आहे, म्हणूनच महाविद्यालयाची जी कामे होणे गरजेचे आहे त्यावर सकारात्मकतेने निर्णय घेऊन ती लवकरच मार्गी लावली जातील असे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी यावेळी महाविद्यालयाच्या वर्षभरातील उल्लेखनीय बाबींचा आढावा घेत, प्रलंबित कामांविषयी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि जिमखाना नूतन इमारतीच्या उपलब्धी बद्दल संस्था व सर्व कार्यकारिणी यांना धन्यवाद दिले. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपाध्यक्ष श्री विश्वास मोरे, उपसभापती श्री देवराम मोगल, तालुका संचालक श्री शिवाजी गडाख, संचालक ॲड.संदीप गुळवे, निफाड शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ शारदाताई नंदकुमार कापसे, सोसायटी चेअरमन श्री भाऊसाहेब कापसे, शा. व्य. स. अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले, प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, महा. विकास समितीचे व शा. व्य. समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा यावेळी यथोचित असा सत्कार करण्यात आला

प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे कार्य व ध्येयधोरण याविषयी माहिती दिली तर डॉ. उत्तमराव डेर्ले यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ. सौ. सीमा डेर्ले यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ, आणि श्री सुधाकर कापसे यांनी आईच्या नावे प्रत्येकी ११ हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सुपूर्त केले. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच श्री रवींद्र बोरगुडे व श्री विशाल पगारे यांनी महाविद्यालयातील होस्टेल, ड्रेनेज, सोलर, व सर्व इलेक्ट्रिशियन चे काम, ना नफा ना तोटा म्हणून सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.उद्घाटन सोहळ्यासाठी क्रीडा संचालक प्रा.चेतन कुंदे, एनसीसी अधिकारी प्रा. एस. बी. गायकवाड, प्रा.अभय वडघुले आणि सर्व प्राध्यापक व सेवक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन प्रा. महेश बनकर यांनी तर आभार चेतन कुंदे यांनी मानले.कार्यक्रमासाठी परिसरातील सभासद, ग्रामस्थ, सर्व प्राध्यापक, सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Comment