Maratha Vidya Prasarak Samaj

मविप्र संस्थेच्या जिल्हाभरातील शाळांकडून अंधनिधी

मविप्र संस्थेडून अंधनिधी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

मविप्र संस्थेच्या जिल्हाभरातील शाळांकडून अंधनिधी म्हणुन जमा केलेल्या १२ लाख ५६ हजार रूपये रकमेचा धनादेश संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. सदर निधीचा वापर हा बेळगावढगा येथे उभारण्यात येणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या वसतिगृह तसेच वृद्धाश्रम बांधण्यासाठी केला जाणार आहे. यावेळी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या अध्यक्षा ॲड.विद्युलता तातेड,सेक्रेटरी शितल सुराणा,अनिल खालकर,मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके,डॉ डी डी लोखंडे,प्रा दौलत जाधव,डॉ नितीन जाधव उपस्थित होते.

मविप्र संस्था गेल्या २५ वर्षापासून अंधनिधीसाठी पुढाकार घेत आहे.

#Nashik#Nasik#Nashikcity

#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024

#Nashikkar#mvp#mvpnashik

Leave a Comment