मविप्रच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय.एम.आर.टी.) मध्ये बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) मार्च २०२४ रोजी दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून “ इंडियन नॉलेज सिस्टिम : रेलेव्हंस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” या विषयावर हे चर्चासत्र होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती श्री. बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस श्री. दिलीप दळवी, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रासाठी व्यावसायिक डॉ. राहुल फाटे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.
या उपक्रमाद्वारे भारतीय ज्ञान प्रणालीचा आजच्या परिस्थितीतही कसा उपयोग होतो आहे जसे कि, निरोगी राहण्यासाठी – आयुर्वेद, तणाव व्यवस्थापन करण्यासाठी – योग, अध्यात्मिक विकासा साठी – वेद इत्यादी. भारतीय ज्ञान प्रणालींनी “वसुधैव कुटुंबकम” (जग एक कुटुंब आहे) या कल्पनेने सर्व प्राण्यांच्या परस्परावलंबनावर भर दिला. पर्यावरणाची थीम आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि संवर्धनाची मागणी लक्षात घेऊन ही तत्त्वे अत्यंत महत्त्वाची होत आहेत. भारतीय ज्ञान प्रणाली ज्ञानाचे एक विशाल भांडार प्रदान करते ज्याचा उपयोग लोक, समुदाय आणि मानवतेच्या प्रगतीसाठी केला जाऊ शकतो हे जाणून घेणार आहोत.
कार्यशाळेतील प्रथम दिवशी मार्गदर्शन प्रथम सत्रात श्री. रमेश पडवळ ( पुरातत्वशास्त्र सर्वेक्षक ) हे पुरातत्वशास्त्रीय संरचनांद्वारे भारतीय ज्ञान प्रणाली विषयी मार्गदर्शन करतील. या सत्राच्या अध्यक्षस्थानी जे.डी.सी. बिटको च्या संचालिका डॉ. सरीता औरंगाबादकर असतील. दुसऱ्या सत्रात सकाळ दैनिकाचे माजी संपादक डॉ. विश्वास देवकर हे अरबिंदो आणि स्वामी विवेकानंदांचे भारतीय ज्ञान प्रणाली मधील योगदान याविषयी मार्गदर्शन करतील सा.फु.पु.वि. उप विभाग नाशिक चे डॉ. उमेश राउत अध्यक्षस्थानी असतील, तर तिसऱ्या सत्रामध्ये तज्ञांचे चर्चासत्र आयोजित केलेले असून त्यामध्ये समन्वयक म्हणून प्रा. अशोकराव सोनवणे हे काम पाहणार असून यासाठी ह.भ.प. डॉ. लहवितकर महाराज, योगाचार्य श्री. आशुतोष पवार, वैद्य श्री. विक्रांत जाधव, संगीतकार श्री. संजय गीते, आणि बौद्ध भिक्खू पूज्य भंते धर्मरक्षित बुद्धा (त्रिरश्मी लेणी नाशिक) उपस्थित राहणार आहेत हे विविध विषयावरती ते आपली मते मांडतील.
दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये पेपर प्रेसेंटेशन होईल. यासाठी नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नासिक च्या संचालिका डॉ. सुवर्णा शिंदे , सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चे संचालक डॉ. सुहास धांडे, आय.एम.आर.टी. चे डॉ. डी के मुखेडकर, एम.जी.व्ही. पंचवटी च्या डॉ. जयश्री भालेराव, मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नासिक च्या संचालिका डॉ. प्रीती कुलकर्णी हे परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रामध्ये निरोप समारंभ असेल यासाठी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपसभापती श्री डी. बी. मोगल, उपाध्यक्ष श्री. विश्वासराव मोरे आणि श्री. देवदत्त गोखले हे उपस्थित असतील. निरोप समारंभा नंतर उदाजी महाराज संग्रहालय येथे तज्ञ, संशोधक विद्यार्थी व राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी सर्व मान्यवर भेट देणार असुन त्यामधून भारतीय ज्ञान पद्धतीचा सध्याच्या शिक्षण पद्धती मध्ये वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा मनोदय आहे.
या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी घ्यावा असे आवाहन आय.एम.आर.टी.चे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी व चर्चासत्राचे समन्वयक डॉ. संजय गायकवाड यांनी केले आहे.
#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik