आपल्या भारतीय संस्कृतीने,तिच्या इतिहासाने, भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने जगात एक स्थान निर्माण केले आहे. भारतात वेगवेगळे लोक,धर्म,वातावरण,भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य असून ते आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशातील विविध राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषा या येथील संस्कृती,परंपरा याला अनुसरुन आहेत. भारतातील या विविधतेतील एकतेचा अभ्यास युवकांनी करावा. आपली संस्कृती व भाषा टिकवावी,वाढवावी असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते संवादक राहुल सोलापूरकर यांनी केले ते के टी एच एम महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते, यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, संस्थेचे उपसभापती डी बी मोगल,संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. संदीप गुळवे,शिवाजी गडाख, साहेबराव भालेराव ,रामदास भंडारे,पांडुरंग पिंगळे,डॉ भास्कर ढोके,प्रा बी डी पाटील,डॉ नितीन जाधव,प्रा डी डी जाधव, प्राचार्य डॉ आर डी दरेकर, उपप्राचार्य डॉ पी व्ही कोटमे,डॉ कल्पना अहिरे,डॉ व्ही बी बोरस्ते, प्रा विष्णू सोनवणे, प्रा सोपान जाधव,प्रा के के शिंदे,प्रा भगवान शिंदे उपस्थित होते.
युवकांनी देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचन करावे,कारण जो देश आपला इतिहास विसरतो त्याचा वर्तमान धोक्यात असतो व भविष्यहि लडखडते असे सांगून सोलापूरकर यांनी गुणवंतांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिकच नव्हे तर कला,क्रीडा सर्वच क्षेत्रात देशात आघाडीवर आहेत. त्यांना छत्रपती पुरस्कार देखील मिळालेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राध्यापक व विद्यार्थी संशोधन व पेटंटवर अधिक काम करीत आहेत. आयुका,आयसर संस्थासोबत आपण विविध करार केलेले आहेत.विविध कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करीत असल्याचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी सांगितले.
संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी हे सर्व स्थरातील अनेक स्पर्धा,शैक्षणिक,सांस्कृतिक,कला,क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असल्याचे उपसभापती डी बी मोगल यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी प्रास्ताविक व प्र.पाहुण्यांचा परिचय करून दिला. वृषाली या क्रीडापटूने क्रीडा अहवालाचे वाचन केले.यावेळी पीएचडी,पेटंट आदी प्राप्त प्राध्यापक तसेच नेट-सेट,गेट,एन सी सी ,नेव्हल,विविध विद्यापीठ,राज्य व राष्ट्रस्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ,गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा टी सी पाटील, प्रा छाया लभडे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ व्ही बी बोरस्ते यांनी मानले
#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik