विद्यार्थ्यांनी आपले यशस्वी करिअर घडविताना कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सध्याच्या काळात समाजकार्य प्रशिक्षित मनुष्यबळ अनेक क्षेत्रात आवश्यक झाले आहे. आरोग्य, कुटूंब, शिक्षण या सर्वच क्षेत्रात समुपदेशन आवश्यक असल्यामुळे खूप संधी निर्माण झाल्या आहेत असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितिन ठाकरे यांनी केले. यावेळी संस्थेचे सभापती श्री बाळासाहेब क्षिरसागर , उपाध्यक्ष विश्वास मोरे ,चिटणीस दिलीप दळवी ,संचालक ॲड संदीप गुळवे, प्रवीण नाना जाधव, अमित बोरसे, ॲड रमेशचंद्र बच्छाव, विजय पगार, रमेश पिंगळे, सेवक संचालक सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. नितिन जाधव उपस्थित होते.
समाजकार्य महाविद्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावं तसेच विविध व्यावसायीक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवर अतिथिंच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली. अतिथींचे स्वागत तसेच स्वागत पर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.विलास देशमुख यांनी केले. शैक्षणिक वर्ष 2023 – 24 शैक्षणिक अहवालाचे सादरीकरण डॉ.सोनल बैरागी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे होते. पारितोषिकांची उद्घोषना डॉ. प्रतिभा पगार यांनी केली तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिमा पवार यांनी केले.