मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडेमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहावीचा (ICSE Board) निकाल १०० टक्के लागला. ईशांत दिलीप चौधरी हा ९७.६० % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर आर्यन शिवाजी थेटे ९७.००% व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच परा शांताराम ठाकरे ९६.८० % तृतीय क्रमांक, आदि पवन बोरसे व स्वरा नितीन दराडे ९६.६० % हे चौथ्या क्रमांकाने तसेच अंश पवन बोरसे ९६.२० % पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शाळेची हि आय.सी.एस.ई.ची अकरावी बॅच असून विद्यालयातील १३१ विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थ्यांना ९०% च्या वर व ६७ विद्यार्थी उत्कृष्ठ श्रेणीने तसेच २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
इंग्रजीमध्ये स्वरांगी दिंडे ९६/१००, हिंदीमध्ये श्रद्धा देवकर, सृष्टी शिंदे, जोहा खान ९७/१००, फ्रेंचमध्ये कुंतल वारे ८७/१००, मराठीमध्ये ईशांत चौधरी, आर्यन थेटे, परा ठाकरे, अंश बोरसे, सिध्दी मेधने,संयुक्ता काकड,श्रावणी शिंदे,साहिल निकम, शर्विल गोरे, सानिका शिंदे ९९/१००, समाजशास्त्रमध्ये स्वरा दराडे १००/१००, गणितात ईशांत चौधरी १००/१००,विज्ञानमध्ये ईशांत चौधरी,आदिती निकम,परा ठाकरे ९७/१००, संगणक विषयामध्ये ईशांत चौधरी,आदिती निकम,अंश बोरसे १००/१००,कला विषयामध्ये त्रिवेणी दळवी १००/१००, शारीरिक शिक्षण विषयामध्ये आर्यन थेटे,राज सागर मोरे १००/१०० असून विषयवार सर्वाधिक गुण मिळाले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल,संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी श्री.बी.डी. पाटील, शालेय समिती सदस्य यांनी होरायझन अकॅडेमीच्या मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा, शिक्षक व सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले.