आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथील 2018-19 च्या बॅचच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचे स्वागत भव्य मिरवणुकीने झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ.मानसी पाटील यांनी सरस्वती वंदना सादरकेली. यावेळी इंटर्नशिप विभागाच्या प्रभारी डॉ. सुनीता पवार यांनी स्वागत तर कम्युनिटी मेडिसिनचे विभाग प्रमुख डॉ.बालाजी अलमले यांनी प्रास्ताविक केले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे यांनी पदवीदान देत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर केला.यावेळी सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी नवीन पदवीधरांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सुदृढ आरोग्य संपन्न भारत घडवण्यासाठी डॉक्टरांनी काम करावे, वैद्यकीय प्रगत संशोधनाच्या आधारे अचूक रोग निदान करून गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा द्यावी,असे सांगत शुभेच्छा दिल्या. 2018-19 च्या बॅचच्या एकूण 119 एमबीबीएस विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ.जगदीश मते ,डॉ.अभिषेक सुरुसे आणि डॉ.स्वस्ती शर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व विभागप्रमुख व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.यशोवर्धन तोतला,डॉ.अक्षदा शिंदे आणि डॉ.स्निग्धा ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ.अक्षदा शिंदे यांनी आभार मानले.