Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

नेदरलँड येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ रोइंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे खेळाडू निलेश धोंडगे व ऋषिकेश शिंदे यांची भारतीय विद्यापीठ संघात निवड

नेदरलँड येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ रोइंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे खेळाडू निलेश धोंडगे व ऋषिकेश शिंदे यांची भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली आहे. सदर स्पर्धा या नेदरलँड येथे 2 जुलै ते 6 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. त्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती श्री.बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष श्री.विश्वास मोरे, उपसभापती श्री.डी.बी. मोगल, चिटणीस श्री. दिलीप दळवी, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. नितिन जाधव, के.टी. एच.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.डी. दरेकर, जिमखाना विभाग प्रमुख श्री. सोपान जाधव, बोट क्लब सेक्रेटरी डॉ. योगेश गांगुर्डे यांनी अभिनंदन केले. रोईंग प्रशिक्षक जितेंद्र कर्डीले, समाधान गवळी, योगेश लभडे, प्रकाश आचारी, आप्पा पिंगळे, सचिन भंबारे, महाराष्ट्र राज्य पोलीस रोईंग संघ या सर्वांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले.

Leave a Comment