Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४”

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास “कृषिभूषण महाराष्ट्र एफ .पी. ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कृषी महाविद्यालयाने गेल्या वर्षांपासून कृषी शिक्षण क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांसाठी केलेल्या विस्तार कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच महाविद्यालयाची गुणवत्ता, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम ,शेतकरी मेळावे आयोजित करून विद्यार्थी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या महाविद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी कृषी उद्योजक ,प्रगतशील शेतकरी तसेच प्रशासकीय सेवेत आपले कार्य करत आहे. महाविद्यालयाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर,शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे,डॉ डी डी लोखंडे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment