मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत यंदाही महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल ९७.८०% लागला आहे. कु. नालकर गिरीष शाळिग्राम हा विद्यार्थी ९२. १७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने, निऱ्हाळी प्रार्थना प्रबोध हि विद्यार्थिनी ९०. ८६% सह द्वितीय तर पवार जयदेव साहेबराव हा विद्यार्थी ८८.६७% गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. याशिवाय गणित या विषयात नालकर गिरीष शाळीग्राम यास १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. वाणिज्य विभागाचा निकाल ८८. १६ लागला आहे. यात चंडालिया तृप्ती उज्ज्वलकुमार- ९०. ६७% व खैरनार धीरज शांताराम यांना ९०. ६७% गुणांसह प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे तर द्वितीय क्रमांक सुराणा श्वेता सुनीलकुमार हिने ८९. १७% गुणांसह मिळविला. तृतीय क्रमांक- वाडेकर अभिनव गिरीश- ८८. ३३% याने प्राप्त केला.
कला विभागात घोलप श्रावणी शाम हि विद्यार्थिनी ८५. ५०% गुण मिळवून प्रथम आली तर द्वितीय क्रमांक खांडबहाले ज्योती रामनाथ (८४. ८३%) आणि तृतीय क्रमांक पवार डिम्पल शांताराम (८३. ५०%) यांनी प्राप्त केला. एच.एस.व्ही.सी. व्होकेशनल विभागात साळवे अपूर्वा विजय हि विद्यार्थिनी ७४.८३% गुणांसह प्रथम तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे अहिरे देवयानी महेंद्र (७३. ५०%) व दिंडे स्वाती चंद्रकांत (७२. ३७%) यांनी पटकाविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ आर डी दरेकर, विभाग प्रमुख प्रा. आर. एस. पवार, प्रा. एन. बी. कुयटे , प्रा. के. आर. रेडगांवकर , प्रा. डी .बी गावले उपस्थित होते.
या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल,संचालक मंडळ,स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव यांनी अभिनंदन केले आहे.