म.वि.प्र च्या विज्ञान व गणित विषयातील ११ प्राध्यापकांनी १० दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) १३ मे ते २३ मे यादरम्यान भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे ( IISER) येथे सहभाग घेतला आहे. हा कार्यक्रम मास्टर ट्रेनर बनण्यासाठी तयार केला आहे, ज्यामध्ये पुढे गणित आणि विज्ञान शिक्षकांना सक्रिय-चौकशी-आधारित शिक्षण ( Active Inquiry Based Learning) दृष्टिकोनासह, शिक्षकांनी शिक्षकांसाठी तयार केलेल्या शिक्षण तंत्रांवर भर देऊन प्रशिक्षण दिले जाते.