ओव्हरलोड ट्रक मुळे अपघात होणे नित्याचे आहे, तसेच रॉयल्टीची देखील चोरी होते. त्याचा परिणाम मनुष्य जीवनावर व शासकीय यंत्रणेवर होत असतो. तरी वाढत्या अपघातावर नियंत्रण करणे व रॉयल्टीची चोरी होऊ न देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यावर उपाय म्हणून मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प विकसित केला आहे.
सध्याच्या डिजिटल लँडस्केप मध्ये प्रकल्पांच्या विकासाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीकृत प्लॅटफॉर्म नाही, ज्यामुळे उत्पादक आणि सामग्री निर्मात्यांसाठी ट्रॅकिंग आणि रॉयल्टी प्राप्त करण्यात अडचणी यासारख्या समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात उपलब्ध सामग्रीद्वारे फिल्टरिंग करण्यात ग्राहकांना आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ओव्हरलोड ट्रकमुळे अपघात होण्याचा धोका
वाढतो. त्यामुळे या समस्यांचे सर्वसमावेशक पद्धतीने निराकरण करू शकणाऱ्या ई-रॉयल्टी अथॉरिटी प्लॅटफॉर्म आणि ओव्हरलोड डिटेक्शन सिस्टमची गरज आहे.
o प्रकल्पात एक वेब ॲप्लिकेशन असणार व त्यात तीन पॅनल असेल
o पहिला पॅनल हे वापरकर्त्यांसाठी असणार तसेच दुसरे पॅनल हे कंपनीसाठी असणार व तिसरे पॅनल हे एडमिनसाठी असणार
o वापरकर्त्याला आयटम अथवा स्टॉक ची माहिती दिली जाते व तो त्यासाठी रॉयल्टी रिक्वेस्ट कंपनीला ला करू शकतो
o कंपनी एडमिन ला रिक्वेस्ट करून स्टॉक ऍड करू शकतो व वापरकर्त्याला ते स्टॉक दाखवू शकतो.
o अडमिन स्टॉक ऍड करतो व कंपनीची रॉयल्टी रिक्वेस्ट मंजूर किंवा नाकारू शकतो.
ह्या प्रकल्पामध्ये विद्यार्थांनी दोन उपकरण घेतली आहे त्यात एक ट्रकच वजन चेक करेल किती प्रमाणात ट्रक भरली आहे व दुसरे ट्रक सोर्स ते डेस्टिनेशन प्रवास करताना लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग होईल व संपूर्ण डेटा वेब ॲप वर दिसेल. अश्या प्रकारे हा प्रकल्प भविष्यात फार महत्वपूर्ण ठरू शकतो.
साहिल भंडारे, चेतन गांगुर्डे, संकेत बोरस्ते, साहिल परदेशी या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रकल्पासाठी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत पाटील, प्रकल्प समन्वयक अजित पाटील, मार्गदर्शक स्नेहा टिळे, विभाग प्रमुख माधुरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पाचा वापर रॉयल्टी चोरी थांबवण्यासाठी, तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थयांचे मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांनी अभिनंदन केले.