मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निग या नवीन शाखेला परवानगी मिळाली असून या शाखेसाठी सन २०२४-२५ या वर्षा करिता प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या शाखेच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यात आली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच ही काळाची गरज लक्षात घेवून मविप्र संचलित राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक मध्ये या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीकडून अभियांत्रिकीच्या आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निग या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या शाखांकडे पालक व विद्यार्थी यांचा वाढता कल लक्षात घेऊन त्यांच्या
प्रवेश क्षमतेत वाढ झालेली असून दोन्ही शाखेची प्रवेश क्षमता या वर्षापासून १२० इतकी करण्यात आलेली आहे.
पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सखोलमार्गदर्शन, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, बॉश कंपनीचे ट्रेनिंग सेंटर आणि विविध नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यू च्या आयोजनामुळे मविप्र डिप्लोमा अभियांत्रिकीच्या (तंत्रनिकेतन) महाविद्यालयाचा नावलौकिक झालेला आहे. महाविद्यालयात सन २००८ पासून डिप्लोमा अभियांत्रिकीच्या विविध शाखा कार्यरत आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निग इत्यादी शाखा कार्यरत आहेत. राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. महाविद्यालयातर्फे वर्षभर विविध कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीची विविध संधी उपलब्ध करून दिली जाते. या वर्षी महाविद्यालयाची एकूण प्रवेश क्षमता ही ३४५ वरून ५५२ इतकी झालेली आहे. तरी शहरातील व ग्रामीण भागातील इयत्ता १० पूर्ण केलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासनाच्या डीटीई च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रीयेमार्फत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.
महाविद्यालयास नवीन शाखेला परवानगी मिळण्यासाठी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.