चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशनकडून केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान
चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे होते. यावेळी बोलतांना ॲड.ठाकरे यांनी ‘ अंध विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती प्रशंसनीय आहे, त्यांच्या जिद्दीला सलाम आहे असे सांगत भविष्यात अंध विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे […]









