Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात करण्यात आली. रोबोटिक लॅब चे उद्घाटन सरचिटणीस ॲड. डॉ.नितीन बाबुराव ठाकरे यांनी केले. या प्रसंगी मविप्रचे इगतपुरीचे संचालक श्री. संदीप गुळवे, नाशिक शहराचे संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक श्री. चंद्रजित शिंदे आणि शिक्षणाधिकारी श्री. बी.डी.पाटील, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन …

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात Read More »

संस्थेतील ऐतिहासिक परिवर्तनानंतरची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा

संस्थेतील ऐतिहासिक परिवर्तनानंतरची उद्या पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ! स्वच्छ व पारदर्शक कारभार आणि आश्वासनपूर्ती म्हणून केलेली कामे थेट सभासदांसमोर ठेवण्याची पहिली संधी ! विकासाच्या आराखड्यावर सभासदांच्या मंजुरीची मोहर उमटविण्याची पहिली घटिका ! विश्वासाच्या नात्याला अधिक बळकट करण्याचा वार्षिक शुभदिवस ! संस्थेच्या सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती ! सोबत सभासदत्वाचे ओळखपत्र अवश्य असू …

संस्थेतील ऐतिहासिक परिवर्तनानंतरची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा Read More »

शिक्षकांनी प्रयोगशील व कृतीशील असावे…शिवव्याख्याते प्रशांत देशमुख

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी जोपासून त्यांच्यामध्ये चारित्र्याची बीजे रोवावीत. नवनवीव विषयातील संशोधनामध्ये शिक्षकांनी सहभागी व्हावे. शैक्षणिकदृष्ट्या विविध विषयांमध्ये प्रयोगशील व कृतीशील असावे असे शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी सांगितले ते मविप्र संस्थेच्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त सेवक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात प्रमुख अतिथी म्हणून बोलत …

शिक्षकांनी प्रयोगशील व कृतीशील असावे…शिवव्याख्याते प्रशांत देशमुख Read More »

निफाड महाविद्यालयात जिमखाना नूतन इमारतीचे उद्घाटन

कर्मवीर गणपतदादा मोरे यांचे नाव दिलेल्या निफाड महाविद्यालयाला पन्नास वर्षांची मोठी परंपरा आहे. गणपत दादांच्या विचारांचे व कृतीचे आपण पाईक होऊन तालुका व परिसरातील विद्यार्थी व पालक, सभासदांच्या गरज व मागणीनुसार, विद्यापीठाच्या नियमांचा सखोल अभ्यास करून व्यवसायभिमुख कोर्सच्या अंतर्गत निफाड येथे नवीन महाविद्यालय उभारणी करण्याचे आश्वासन सर्व कार्यकारिणीच्या वतीने सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी दिले. निफाड …

निफाड महाविद्यालयात जिमखाना नूतन इमारतीचे उद्घाटन Read More »

सर्व गुरुजनांना नमन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अज्ञाताच्या अंधारात असणाऱ्या प्रत्येकाची ओळख निर्माण केली जगातल्या दु:खाची मला जाणीव करून दिली त्यांनी अशी कृपा केली,आणि माझ्यात चांगल्या माणसाची मूर्ती घडवली गुरूंनीच मला एक चांगला माणूस बनवले! सर्व गुरुजनांना नमन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

२५ विद्यार्थ्यांची विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये निवड

मविप्र समाजाच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील २५ विद्यार्थ्यांची विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये मध्ये निवड झाली असून त्यामध्ये कोटक लाईफ आणि टी सी एस या कंपनीने वार्षिक ५.२५ लाख इतके वार्षिक पॅकेज दिले. त्याचप्रमाणे संडोझ (नोवार्टीस) ,मायक्रोलॅब्स व इंटास यांनी देखील वार्षिक ३.५ लाख इतके पॅकेज दिले. याव्यतिरिक्त युनिकेम,मॅक्लॉइड या कंपन्यांनी सरासरी वार्षिक ३ लाखापर्यंत पॅकेज देऊ …

२५ विद्यार्थ्यांची विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये निवड Read More »

होरायझन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांची रायफल शुटींग मध्ये महाराष्ट्र संघाकडून निवड

CISCE अंतर्गत प्रादेशिक रायफल आणि पिस्तोल नेमबाजी स्पर्धा २०२३-२०२४ ह्या दिनांक २४ ते २६ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प), मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये होरायझन अकॅडेमी ICSE, नाशिक या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत एकूण ३१ शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत होरायझन अकॅडेमीच्या …

होरायझन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांची रायफल शुटींग मध्ये महाराष्ट्र संघाकडून निवड Read More »