Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India
MVPS च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर

MVPS च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी…

आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालय आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक निवृत्त सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त शिक्षक-सेवकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली, या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त सेवकांशी संवाद साधताना ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वाटचालीत शिक्षक-सेवकांचे मोठे योगदान असते. त्यामुळे त्यांची कृतज्ञता म्हणून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालय यांच्यावतीने सेवानिवृत्त सेवकांचा आरोग्य तपासणीचा उपक्रम हाती घेतल्याचे प्रतिपादन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. कोविडच्या जागतिक महामारीनंतर सेवानिवृत्त सेवकांची वैद्यकीय तपासणी झाली नव्हती, हा उपक्रम संस्थेने पुन्हा सुरू केला असून सेवानिवृत्त सेवक संघाच्या सभासदांना जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा, सुविधा ह्या सवलतीच्या दरात पुरवल्या जातील, असेही ॲड.ठाकरे यांनी सांगितले

मविप्र कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, निवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष यु. आर जाधव, उपाध्यक्ष एस. आर. पगार, सचिव माणिकराव गोडसे, सहसचिव एल. एस. तिडके व पदाधिकारी उपस्थित होते.

या शिबिरात 154 सेवानिवृत्त सेवकांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्त, लघवी, मधुमेह, रक्तदाब, एक्स-रे, इसीजी अश्या एकूण दहा तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना देवणे, कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी आलमले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाघ,महेश बेंडकुळे, वृषाली वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment