Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

बेंगलोर विद्यापीठाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघात पिंपळगाव महाविद्यालयाच्या विनय अनिल गोसावी आणि प्रवीण गोरख चव्हाण

दिनांक 13 ते 18 मे 2024 या कालावधीत बेंगलोर विद्यापीठाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सॉफ्टबॉल या खेळाचा संघ विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर विष्णू पेठकर यांचे द्वारा नुकताच जाहीर करण्यात आला आहे 15 खेळाडूंच्या या संघामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव महाविद्यालयाच्या विनय अनिल गोसावी आणि प्रवीण गोरख चव्हाण या दोन खेळाडूंचा समावेश आहे.

आदित्य म्हस्के ,केतन बनसोडे ,शिवकुमार माळी , अभिषेक सोनवणे , अथर्व लिधडे, वैभव मोठे, सौरभ गभाले ,रोहन राऊत, चैतन्य पवार, सौरभ जाधव ,फुरकान शेख, धनंजय शिरसाट ,समर्थ जानकर.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन मविप्र समाजाचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले , सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव,प्रभारी प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे या सर्वांनी अभिनंदन केले. वरील खेळाडूंना प्रा.हेमंत पाटील, प्रा. सागर कडलग ,श्री रुपेश पवार, श्री अनंत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे..

Leave a Comment