Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

मविप्र. कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य चंद्रभान ठाकरे याची सहाय्यक आयुक्त पदावर निवड

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगांव बसवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य चंद्रभान ठाकरे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (क्लास १ ) या पदावर निवड झाली आहे. आदित्य हा क.का.वाघ महाविद्यालयातील सेवक कर्मचारी श्री.चंद्रभान ठाकरे यांचा मुलगा असून यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य कर निरीक्षण (STI) व सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय (ASO) या दोन्ही पदांवर पहिल्याच प्रयत्नात निवड होऊन मुंबई येथे तो कार्यरत आहे. ह्या पदावर समाधान न मानत आदित्यने पुढील परीक्षा देण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले व आज सहाय्यक आयुक्त पदाला गवसणी घातली.
आदित्यच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्यातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड.नितीन ठाकरे यांनी आदित्य च्या रूपाने संस्थेचा एक माजी विद्यार्थी अधिकारी झाला हि अतिशय आनंदाची बाब असून आदित्य चा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे असे सांगून आदित्य ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment