मविप्र समाजाच्या ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक रमेश पिंगळे व ॲड. लक्ष्मण लांडगे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या चंद्रकला पाटील, रामदास मुरकुटे, ॲड. रामचंद्र आहेर, सहदेव जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविणारे प्राध्यापक, पीएच.डी.धारक आणि सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नैपूण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
