जेव्हा कौशल्याला मानवतेची साथ लाभते… तेव्हा इतिहास घडतो.
येवला येथील दिवंगत विठाबाई सोनवणे यांच्या अवयवदानाच्या महान निर्णयामुळे आणि त्यांचे सुपुत्र दत्तू प्रकाश सोनवणे व कन्या दीपाली आहेर यांनी दाखवलेल्या अपूर्व अशा सामाजिक भानामुळे मविप्र रुग्णालयात इतिहासातील पहिलं यशस्वी किडनी प्रत्यारोपण शक्य झालं. एका रुग्णाला नवजीवन देणाऱ्या या उदात्त निर्णयाला विनम्र अभिवादन. अवयवदान… हेच मृत्यूनंतरही जीवन देणारं सर्वात मोठं दान असतं. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या मविप्र रुग्णालयातील ट्रान्सप्लांट टीम, सर्जरी, मेडिसिन, भूलशास्त्र विभाग, पॅरामेडिकल कर्मचारी आणि या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…
-ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक


