Maratha Vidya Prasarak Samaj

नाशिककरांनो, घाबरू नका… सतर्क राहा!

नाशिककरांनो, घाबरू नका… सतर्क राहा!
आज रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीती आणि अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
सर्वांना माझे आवाहन आहे की, घाबरून जाऊ नका आणि कोणत्याही अफवा अथवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे प्रसारित करू नका. प्रशासन आणि अधिकृत यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवा.
भूकंपानंतर काही काळ लहान धक्के जाणवण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्या. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधा.
आपल्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असतील तर परिसराचे किंवा गावाचे नाव कमेंटमध्ये जरूर कळवा.
आपण सर्वांनी शांत राहूया, सतर्क राहूया आणि एकमेकांची काळजी घेऊया.
– ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज

Leave a Comment