मविप्रच्या आद्य संस्थापकांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उजाळा देत आहे. त्यांच्या दूरदृष्टीला, त्यागाला आणि समाजनिष्ठ कार्याला कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस म्हणजे ‘मविप्र समाजदिन’! कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात संस्थापकांच्या कार्याचे स्मरण करूया, मान्यवरांच्या विचारांतून नवी प्रेरणा घेऊया आणि मविप्रच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या संकल्पाने पुढे जाऊया. या कृतज्ञता सोहळ्याचे आपणा सर्वांना अगत्याचे निमंत्रण!


