कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. ग्रामीण, बहुजन आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी ‘रयत शिक्षण संस्था’ उभी केली आणि ‘कमवा व शिका’ या विचारातून स्वावलंबी शिक्षणाची दिशा दिली. ज्ञान केवळ काहींच्या हातात न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, हा त्यांचा ध्यास होता. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


