Maratha Vidya Prasarak Samaj

1

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

१९५१ साली महाराष्ट्रातील मुरूड-जंजिरा येथे जन्मलेल्या नाना पाटेकरांचं बालपण संघर्षात गेलं. मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी कलाशिक्षण घेतलं. चित्रकलेची आवड असलेल्या नानांनी पुढे रंगभूमीवर आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. विजय तेंडुलकरांच्या ‘पुरुष’सारख्या नाटकातून त्यांच्या अभिनयातील ताकद प्रेक्षकांसमोर आली. ‘गमन’ चित्रपटातून सुरू झालेला त्यांचा चित्रपटप्रवास ‘अंकुश’मुळे खऱ्या अर्थाने गाजला. ‘सलाम बॉम्बे’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘यशवंत’, ‘वजूद’, ‘शक्ती’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘टॅक्सी नं. ९२११’, ‘वेलकम’, ‘राजनीती’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘नटसम्राट’ अशा एकाहून एक सरस चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली. विधू विनोद चोप्रा, एन. चंद्रा आणि प्रकाश झा यांसारख्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेतून त्यांनी मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं. मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नानासाहेबांनी ‘नाम फाउंडेशन’ उभारून दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबं आणि जलसंधारणासाठी त्यांनी माणुसकीचा हात पुढे केला. पडद्यावरचा बेधडक नायक आणि पडद्याबाहेरचा संवेदनशील माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. नाना, तुमची एक्झिट झाली… पण तुमचा आवाज, तुमचा अभिनय आणि तुमच्यातला माणूस महाराष्ट्राच्या मनातून कधीच एक्झिट घेणार नाही!

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment