Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

Shailesh Yawalkar

राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक मधील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी “कृषी रोबोट” बनवण्यात आला

भारतात 60 टक्क्यांहून अधिक लोक त्यांचे मुख्य काम म्हणून शेती करतात. कामगारांच्या वाढत्या कमतरतेमुळे, आता कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी रोबोट आणि इतर स्व-ड्रायव्हिंग कार विकसित करण्यात अधिक रस आहे. शेतकऱ्यांना करावे लागणारे काम कमी करण्यासाठी, त्यांच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि दर्जा सुधारण्यासाठी “कृषी रोबोट” नावाचा रोबोट बनवण्यात आला आहे. प्रस्तावित प्रणालीचे उद्दिष्ट एक बहुउद्देशीय स्वायत्त कृषी …

राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक मधील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी “कृषी रोबोट” बनवण्यात आला Read More »

१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

१२ वीची परीक्षा म्हणजे करियरच्या प्रवासाला निघालेल्या विद्यार्थ्यांसाठी जणू उंबरठाच ! आज १२ वीचा निकाल लागला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! काही कारणाने अपयश पदरात आलेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा नव्याने प्रयत्न सुरु करावेत व आपल्या शिक्षक-प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेऊन ते अंमलात आणावेत. त्यांच्या या नवप्रयत्नांना मविप्रच्या शुभेच्छा !

दि. २० मे २०२४ ! जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी मतदानाचा पवित्र दिवस

सोमवार, दि. २० मे २०२४ ! जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी मतदानाचा पवित्र दिवस ! मतदानाच्या जनजागृतीसाठी मविप्र’च्या प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने अभिनव मोहीमा यंदा राबविल्या होत्या. मतदान करणे हे प्रत्येक भारतीयाचे पवित्र कर्तव्य आहे. चला आपण मतदान करू व आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईक-मित्रांनाही मतदानासाठी उद्युक्त करू ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !

सीबीएसई दहावीच्या निकालात मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील विद्यार्थ्यानी दैदीप्यमान यश प्राप्त केले

सीबीएसईने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील विद्यार्थ्यानी दैदीप्यमान यश प्राप्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी तब्बल नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवून पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळविला आहे. यात खुशी पाटील हिने 97 टक्क्यांसह प्रथम क्रमांक तर अस्मिता जगझाप हिने 96 टक्क्यांसह द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक सिद्धेश घोटेकर व समर्थ मुळाणे यांना 94.40 टक्यांसह …

सीबीएसई दहावीच्या निकालात मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील विद्यार्थ्यानी दैदीप्यमान यश प्राप्त केले Read More »

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ताहाराबाद विद्यालयातील विद्यार्थी कु. योगेश नामदेव सोनवणे याने राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक

ताहाराबाद येथील मविप्र संस्था संचलित, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ताहाराबाद विद्यालयातील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी कु. योगेश नामदेव सोनवणे याने राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मविप्र संस्थेचे तसेच ताहाराबाद विद्यालयाचे नाव उज्वल केले. नुकतीच हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेत ताहाराबाद विद्यालयातील विद्यार्थी योगेश सोनवणे …

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ताहाराबाद विद्यालयातील विद्यार्थी कु. योगेश नामदेव सोनवणे याने राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक Read More »

कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४”

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास “कृषिभूषण महाराष्ट्र एफ .पी. ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी महाविद्यालयाने गेल्या वर्षांपासून कृषी शिक्षण क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांसाठी केलेल्या विस्तार कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच महाविद्यालयाची गुणवत्ता, …

कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४” Read More »

नेदरलँड येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ रोइंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे खेळाडू निलेश धोंडगे व ऋषिकेश शिंदे यांची भारतीय विद्यापीठ संघात निवड

नेदरलँड येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ रोइंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे खेळाडू निलेश धोंडगे व ऋषिकेश शिंदे यांची भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली आहे. सदर स्पर्धा या नेदरलँड येथे 2 जुलै ते 6 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. त्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती श्री.बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष …

नेदरलँड येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ रोइंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे खेळाडू निलेश धोंडगे व ऋषिकेश शिंदे यांची भारतीय विद्यापीठ संघात निवड Read More »

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथील एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथील 2018-19 च्या बॅचच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचे स्वागत भव्य मिरवणुकीने झाले. त्यानंतर मान्यवरांच्या …

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथील एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ Read More »

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी सुलभतेने शिक्षण घेण्याच्या उद्देशाने हृदयस्पर्शी उपक्रमात, के टी एच एम महाविद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना नुकतेच अत्याधुनिक स्मार्ट व्हिजन चष्म्यांचे वाटप

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी सुलभतेने शिक्षण घेण्याच्या उद्देशाने हृदयस्पर्शी उपक्रमात, के टी एच एम महाविद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना नुकतेच अत्याधुनिक स्मार्ट व्हिजन चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हाँगकाँग येथे मुख्यालय असलेल्या चेन्नईस्थित ‘हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन’ संस्थेच्या सहकार्याने हा प्रयत्न शक्य झाला, जो विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या …

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी सुलभतेने शिक्षण घेण्याच्या उद्देशाने हृदयस्पर्शी उपक्रमात, के टी एच एम महाविद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना नुकतेच अत्याधुनिक स्मार्ट व्हिजन चष्म्यांचे वाटप Read More »

“उदाजी इंग्रजी प्रभुत्व प्रकल्प” मविप्र. च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेचे प्राविण्य वाढवण्याच्या उद्देशाने लवकरच राबवण्यात येईल

मविप्र माजी विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे इंग्रजी भाषेचे प्राविण्य वाढवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा पायलट प्रकल्प सुरू करत आहे. ह्या क्षेत्रातील निष्णात EduTech कंपन्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येईल. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना ह्याने मोठी मदत होणार आहे. उदाजी वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने ग्रामीण भागातून येणाऱ्या मविप्रच्या विविध शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी अधिक आत्मसात करण्यासाठी “उदाजी …

“उदाजी इंग्रजी प्रभुत्व प्रकल्प” मविप्र. च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेचे प्राविण्य वाढवण्याच्या उद्देशाने लवकरच राबवण्यात येईल Read More »