के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी जेष्ठ अभिनेते, संवादक राहुल सोलापूरकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
आपल्या भारतीय संस्कृतीने,तिच्या इतिहासाने, भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने जगात एक स्थान निर्माण केले आहे. भारतात वेगवेगळे लोक,धर्म,वातावरण,भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य असून ते आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशातील विविध राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषा या येथील संस्कृती,परंपरा याला अनुसरुन आहेत. भारतातील या विविधतेतील एकतेचा अभ्यास युवकांनी करावा. आपली संस्कृती व भाषा टिकवावी,वाढवावी असे प्रतिपादन […]









