Maratha Vidya Prasarak Samaj

1

मा. खासदार राजाभाऊ वाजे यांची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड…नाशिक व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून या प्रतिनिधी मंडळात निवड झालेले ते एकमेव खासदार आहेत.
५ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या विविध बैठका व समित्यांच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत. या माध्यमातून भारताची भूमिका, भारतीय लोकशाही आणि जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
लोकसभेतील सक्रिय सहभाग, नाशिकसह देशाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने मांडलेली भूमिका आणि संसदीय कामगिरीची दखल म्हणून मिळालेला हा बहुमान नाशिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
नाशिकचा माणूस जगात गाजणार…
खा. राजाभाऊंचा आवाज UNO मध्ये वाजणार! 🇮🇳

Leave a Comment