Maratha Vidya Prasarak Samaj

1

देशातील अग्रगण्य टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर (TMTC), पुणे येथे आयोजित ‘सारथी : प्रिन्सिपल्स ॲज लीडर्स’

देशातील अग्रगण्य टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर (TMTC), पुणे येथे आयोजित ‘सारथी : प्रिन्सिपल्स ॲज लीडर्स’ या नेतृत्व विकास प्रशिक्षणासाठी निवड होणारी मविप्र ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली, हा संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे.
मविप्रच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील २२ मुख्याध्यापकांनी हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. नेतृत्व विकास, प्रभावी संवाद, भावनिक बुद्धिमत्ता, परिवर्तन व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्णयक्षमता आणि भविष्याभिमुख शैक्षणिक नेतृत्व अशा विविध विषयांवरील जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनातून ते समृद्ध झाले.
हे प्रशिक्षण केवळ मुख्याध्यापकांचे कौशल्य वृद्धिंगत करणारे नाही, तर मविप्रच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रभावी व्यवस्थापन आणि उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता रुजविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.
कारण नेतृत्व घडतं… तेव्हा भविष्य घडतं!

Leave a Comment