पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ध्यास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी शक्ती आहे, या विचारातून त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांनी लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. शिक्षण क्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीची भूमिका कायम स्मरणात राहील. मविप्र समाजाच्या वतीने आम्ही पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.
*- ॲड. नितीन ठाकरे,* सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.
.
.
#dypatil #restinpeace #advnitinthakare2026 #marathavidyaprasaraksamaj #mvpnashik


