आपल्यासाठी राबणाऱ्या पशूंच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचा सन्मान करणं — हीच आपल्या संस्कृतीची सुंदर शिकवण आहे. काळ बदलला, शेतीत यंत्रं आली, ट्रॅक्टर आले; पण बळीराजाच्या जीवनात बैलजोडीचं स्थान आजही तितकंच जिव्हाळ्याचं आहे. बैलपोळा हा केवळ सण नाही, तर माणूस आणि पशू यांच्यातील ऋणानुबंध जपणारी आपली समृद्ध परंपरा आहे.
ही परंपरा आजही प्रेमाने जपणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना मनापासून धन्यवाद आणि बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
— ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक


