मविप्र समाजाचे ज्येष्ठ सभासद, सुप्रसिद्ध अभियंता आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व मा. बाळासाहेब लक्ष्मणराव मगर यांच्या निधनाने मविप्र परिवाराने एक ज्येष्ठ, स्नेहशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची, माणुसकीची आणि जिव्हाळ्याच्या स्वभावाची आठवण सदैव आपल्या मनात राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी निश्चितच भरून न निघणारी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही मनःपूर्वक सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. मा. बाळासाहेब मगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.-अॅड. नितीन बाबुराव ठाकरे, सरचिटणीस, सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.


