आज मविप्रने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. अमेरिकेतील अर्शा कन्सल्टंट्स सोबत झालेल्या सामंजस्य करारातून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान विकसित करण्याची दिशा निश्चित झाली आहे. या भागीदारीमुळे KBTCOEच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधन, उद्योगसहकार्य आणि नवोपक्रमाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बळावर समाजहितासाठी जागतिक पातळीवर वाटचाल करणारे मविप्रचे हे आणखी एक अभिमानास्पद पाऊल आहे.
.
.
.


